भारतीय रेल्वेने जिंकली शर्यत! बिहार ते गिनीपर्यंत ‘धावणार‘ १५० रेल्वे इंजिन!

- शंभर किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या इंजिनची शंभर बोगी खेचून नेण्याची क्षमता

    17-Jun-2025
Total Views | 12
 
Indian Railways from Bihar to Guinea
 
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इंजिन बिहारच्या मारहौडा जिल्ह्यातून थेट आफ्रिकन देश असलेल्या गिनीपर्यंत प्रवास करणार आहे. तब्बल दीडशे ‘मेड इन इंडिया’ रेल्वे इंजिनांची मागणी या देशाकडून झाली होती. लवकरच टप्प्याटप्प्यांत लोकोमोटिव्ह इंजिनचा पुरवठा या आफ्रिकेतील गिनी या देशाला केला जाणार आहे.
 
भारतीय रेल्वेची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. भारतीय रेल्वे मार्ग हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मार्ग मानला जातो. गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली आहे. वंदे भारत, विस्टाडोम कोच, तेजस अशा अनेक अद्यावत तंत्रसुसज्ज रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत अवतरल्या. आता भारतीय रेल्वेची भूरळ भारताबाहेरील देशांनासुद्धा लागली आहे.
 
आफ्रिकन देश असलेल्या गिनीमध्ये भारतीय रेल्वे लवकरच लोकोमोटिव्ह इंजिन पुरवणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली. बिहारच्या मारहौडा येथील रेल्वेची लोकोमोटिव्ह फॅक्टरी तीन वर्षांत गिनीला ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दीडशे इंजिन पुरवणार आहे.
 
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले की, "या वर्षात भारताकडून गिनीला ३७ रेल्वे इंजिन पाठवले जातील, तर पुढील वर्षात ८२ इंजिन आणि २०२७ मध्ये ३१ इंजिन पाठवले जातील. या सर्व इंजिनाना मारहौडा येथील रेल्वे लोकोमोटिव्ह फॅक्टरीमध्ये तयार करण्यात येणार आहे. यासाठी कारखाना परीसरात केपगेजचे ट्रॅक, स्टँडर्डगेज, ब्रॉडगेज तयार करण्यात आले आहे.
 
...आणि भारतीय रेल्वेने जिंकली बोली
 
गिनी देशातर्फे विविध देशांतील रेल्वे कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वात कमी बोली लावत भारतीय रेल्वेने हे कंत्राट मिळवून दाखवले. या भारतीय बनावटीच्या लोकोमोटिव्ह इंजिनद्वारे गिनी देशातील एका मोठ्या लोहखनिज प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा निर्माण मदत होणार आहे. या कराराने भारत-आफ्रिका आर्थिक संबधही दृढ होतील. लोकोमोटिव्हमध्ये वातानुकूलित केबिन असतील. कमाल १००च्या वेगाने एकाचवेळी दोन लोकोमोटिव्ह शंभर बोगी वाहून नेऊ शकतात. हा करार भारतीय बनावटीच्या लोकोमोटिव्ह निर्यातीसाठी स्थानिकांना मोठा रोजगार देणारा ठरला आहे.
 
भारतीय रेल्वे जगाला आणखी काय निर्यात करते?
 
भारतीय रेल्वे जगातील अनेक देशांना प्रवासी कोच, बोगी, लोकोमोटीव्ह आणि रेल्वेशी संबंधित अन्य वस्तूं यांसारखी उपकरणे पुरवते. विशेषतः अलिकडेच भारत सरकारने रेल्वेची निर्यात वाढवली आहे. गिनी व्यतिरिक्त, भारतीय रेल्वे जगातील इतर अनेक देशांना रेल्वेशी संबंधित वस्तूंचा पुरवठा करतो. याशिवाय, भारतीय रेल्वे फ्रान्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलियाला सौदी अरेबिया यांसारख्या देशाला बोगी अंडर-फ्रेमसारखे रेल्वे भाग निर्यात करते.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121