- महसूल विभागाचा आदेश; अवलंबितांचा सांभाळ करण्याचे प्रतिज्ञापत्र
09-May-2025
Total Views | 16
मुंबई: ( kotwal Compassionate policy ) कोतवाल संवर्गातील (महसूल सेवक) कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू झाले असून, सेवेत असताना मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघातामुळे काम करण्यास असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार महसूल विभागाने आज मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधितांकडून दिवंगत महसूल सेवकावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञा पत्र घेण्याची अट घालण्यात आली आहे.
नियुक्तीसंदर्भातील ११ मुद्द्यांचा या आदेशात अंतर्भाव आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या कोतवाल पदांच्या १० टक्के क्षमतेने नियुक्ती केली जाईल.