मुख्यमंत्री होण्याबाबत अजित पवारांची मिश्कील टिप्पणी म्हणाले, "मलासुद्धा..."

    03-May-2025
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : मलाही अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण कुठे जतमंय? अशी मिश्कील टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, ३ मे रोजी केली. मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
ज्येष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, असे मत व्यक्त केले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हावी, असे आपल्या सगळ्यांनाच वाटत असते. परंतू, शेवटी तो योगही जुळून यावा लागतो. मलाही अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते, पण कुठे जतमंय? त्यामुळे कधी ना कधी योग येईल," अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.
 
 
ते पुढे म्हणाले की, "ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. तामिळनाडूमध्ये जयललीतांनी स्वत:च्या ताकदीवर अनेकदा राज्य मिळवले. त्यांच्यावर एक चित्रपटदेखील निघाला. अशा कितीतरी महिलांची नावे आपल्याला घेता येतील. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, करुणामूर्ती माता रमाई अशा अनेक महान विभूती आपल्या महाराष्ट्राला लाभल्या आणि त्यांचे कर्तृत्व आपण पाहिले आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची मुख्यमंत्री एक महिला असेल, तो दिवस काही दूर नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.