अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : ( ajit pawar on budget session ) विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या.
यापैकी ९३२.५४ कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य खर्चासाठी, राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ४२० कोटी रुपये, तर केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने २ हजार १३३ पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. ६ हजार ४८६ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४ हजार २४५ कोटी इतका असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.
कुठल्या योजनेसाठी किती निधी?
१) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - ३ हजार ७५२ कोटी
२) मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजना- २ हजार कोटी
३) मुद्रांक शुल्क अनुदान (महानगरपालिका व नगरपालिका) - ६०० कोटी
३) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता - ३७५
४) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान - ३३५ कोटी
५) ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथदिवे - ३०० कोटी
६) साखर कारखान्यांना भागभांडवलनिर्मितीसाठी - २९६ कोटी
कुठल्या विभागाला किती निधी?
ग्राम विकास विभाग - ३ हजार ६ कोटी
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग - १ हजार ६८८ कोटी