फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत पालिका आणि पोलिस प्रशासनाला उचित सूचना देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित केला प्रश्न

    11-Mar-2025
Total Views | 92
 
Kalidas Kolambkar Devendra Fadanvis
 
मुंबई : आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला उचित सूचना करण्याचे आश्वासन दिले.
 
"आज सगळे फेरीवाले रस्त्यावर लढत आहेत. त्यांना का त्रास दिला जातो? सुरुवातीला त्यांना कायदेशीरपणे लायसन्स देण्याचा प्रयत्न होता. पण फेरीवाल्यांना लायसन्स का देत नाहीत हासुद्धा प्रश्न आहे," असा प्रश्न कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित केला. यावर आपण आज टाऊन वेडिंग ॲप करत आहोत. मुंबईतील फेरीवाल्यांना दहा, वीस हजार रुपये कर्जही दिले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत माहिती घेऊन उचित सूचना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121