मुंबई, दि. १० : प्रतिनिधी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी दि. २० मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.
नाशिक मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना दिनांक २० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दि. २१ मार्च रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दि.२१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक ०९ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर केला जाणार असल्याचे आवळकंठे यांनी सांगितले.