"जॉन अब्राहम कूल दिसतो, कारण तो ड्रग्ज...",मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक

    09-Jan-2025
Total Views |

devendra fadnavis
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अंमली पदार्थविरोधी अभियानात अभिनेता जॉन अब्राहम देखील सहभागी झाला होता. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी जॉन अब्राहमचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्जला नाही म्हणतो".
 
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जॉन अब्राहमसारखे अतिशय प्रतिथयश कलावंत ज्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत, पण ते पाहत असतानादेखील जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्ज घेत नाही. त्या वातावरणातही ड्रग्जला नाही म्हणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. माझ्या जीवनात मीदेखील कधीही कुठल्याही अंमली पदार्थाला हात लावला नाही. आता तर शक्यच नाही. पण, कॉलेजमध्येदेखील कधी कुणाची मला विचारायची आणि सवय लावायची हिंमत झाली नाही. याचं कारण म्हणजे हा निर्धार आपल्या मनात असला पाहिजे".
 
 
 
दरम्यान, जॉन अब्राहम हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता असून त्याच्या फिटनेससाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी म्हणजेच२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेदा या सिनेमात तो दिसला होता. आता २०२५ मध्ये 'तेहरान' या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.