वाराणसीतील मुस्लिमबहुल भागात असलेल्या कुलूपबंद मंदिराची दारे खुली, हिंदूंच्या आंदोलनाला अखेर यश

    08-Jan-2025
Total Views |
 
Locked temple
 
लखनऊ : वाराणसीच्या मदनपूरमध्ये कट्टरपंथींयांच्या वस्तीमध्ये कुलूपबंद असलेले मंदिर ८ जानेवारी २०२५ रोजी उघडण्यात आले. यानंतर महादेवाच्या शिवलिंगाची पहिली प्रतिमा आता समोर आली आहे. बुधवारी प्रशासनाच्या पथकाने मंदिराचे कुलूपबंद असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडत साफसफाई सुरू केली. यानंतर आता मंदिरामध्ये महादेवाचे शिवलिंग त्याठिकाणी दिसू लागले असून संपूर्ण परिसरामध्ये हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहेत. यासाठी हिंदू अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते.
 
दुसरीकडे मंदिराच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने पथक तैनात केले. शिवाय संबंधित घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण राखण्यासाठी पोलिसांसह पीएसीही तैनात करण्यात आली आहे. साफसफाई झाल्यानंतर लवकरच मंदिरात पूजा सुरू होणार, असे सांगण्यात आले आहे.
 
या मंदिरामध्ये सनातन दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा म्हणाले की, सिद्धेश्वर मंदिर सार्वजनिक ठिकाणी आहे. त्यामुळे कोणीही त्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही. त्यांनी दावा केली की, घराची पुष्टी करण्यात आलेल्या संबंधित कागदपत्रांमध्ये मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचा कोणताही पुरावा नाही, हे पुरावे तपासून प्रशासनाने आता या बंद मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मदनपुरामध्ये हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराला खेटून असलेली आजूबाजूची घरे ही मुस्लिमांना विकण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर तेच घर राजा महेंद्र रंजन रॉय यांच्या नावावर होते. दरम्यान मंदिर असलेला संबंधित भाग हा मुस्लिमबहुल असल्याचे सांगण्यात येत आहे.