मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर तीन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केले. जरांगेंचे भाषण दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे असा आरोप करत बंजारा समाजातील लोकांनी परळी येथे शिवाजीनगर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. धनंजय मुंडे समर्थकांनी देखील आक्रमक भूमिका घेत जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परळी, केज, अंबाजोगाई या तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.