कानपूरमध्ये पुन्हा एकदा घातपाताचा प्रयत्न? रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलेंडर

    02-Jan-2025
Total Views | 48

KANPUR
 
कानपूर : (Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलेंडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
 
मंगळवारी रात्री गस्तीदरम्यान रेल्वे पोलिसांना स्टेशनपासून पश्चिमेला काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ४५ जवळ रेल्वे रुळावर पाच किलोचा गॅस सिलेंडर ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यावर रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर सापडला. हा गॅस सिलेंडर रिकामा आणि काहीसा जुना दिसत होता, मात्र अपघाताचा कट असल्याचा संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी एक रिकामे पोतेही सापडले. हे सिलेंडर या पोत्यामधून आणण्यात आल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
 
रेल्वे रुळावर पुन्हा एकदा गॅस सिलिंडर सापडल्याने अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. क्रॉसिंगच्या आजूबाजूच्या काही दुकानदारांकडे या प्रकरणाबाबत चौकशी केली असता त्यांना कोणताही सुगावा लागला नाही. बुधवारी जीआरपीचे एसपी अभिषेक वर्मा आणि इटावा रेल्वे पोलिसांचे एसीपी उदय प्रताप सिंह घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमसोबत तपास केला. या घटनेत काही टवाळखोरांचा हात असू शकतो असे त्यांनी सांगितले. रिकामा सिलेंडर रुळावर ठेवून पोलीस आणि प्रशासनाला त्रास देण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
 
चार महिन्यांपूर्वी घटनास्थळापासून काही अंतरावर ट्रॅकवर गॅस सिलिंडर टाकून कालिंदी एक्स्प्रेसचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता. येथे मोठी दुर्घटना टळली. शिवराजपूर येथील बराजपूर रेल्वे स्थानकापासून मुदेरी गावाजवळ ९ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर टाकून कालिंदी एक्स्प्रेस उलटविण्याचा कट रचण्यात आला. या घटनेचा तपास करूनही अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121