मुंबई : अभिनेता रणवीर सिंह रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता त्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटातील लूक व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून सेटवरील व्हिडिओ फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ‘धुरंधर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच चित्रपटासंदर्भातील अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील एक फोटोही व्हायरल झाला होता. रणवीर सिंह या फोटोत लांब केस, वाढलेली, पिवळ्या रंगाचा पठाणी सूट अशा लूकमध्ये तो दिसत आहे. त्याच्यासोबत काही सहकलाकार असून त्यांच्या हातात बंदुका दिसत आहेत. याशिवाय आणखी एका फोटोत रणवीरने पगडी घातलेली दिसत आहे. दरम्यान, धुरंधर मधील त्याच्या व्हायरल लूकमुळे आता चित्रपट कधी येणार याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
२०२४ मध्ये जुलै महिन्यात रणवीर सिंहने सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा केली होती. ‘धुरंधर’ चित्रपटात संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांचीही मुख्य भूमिका असणार असून रणवीर सिंह यामध्ये कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. बी६२ स्टुडिओज बॅनर अंतर्गत चित्रपटाची लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी निर्मिती केली आहे. तसेच, चित्रपटात अभिनेत्री यामी गौतमही झळकणार आहे.