धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन, बीड आणि परभणी प्रकरणांत न्यायाची मागणी
11-Jan-2025
Total Views |
धाराशिव : (Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे-पाटील, खासदार बजरंग सोनावणे , आमदार सुरेश धस यांसह आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अभिमन्यू पवार, ज्योति मेटे , दीपक केदारसह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चात उपस्थित राहणार आहेत.
आम्हाला न्याय मिळाला पाहिजे : वैभवी देशमुख
"माझ्या वडिलावर जो अन्याय झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आधीच्या घटना घडल्या त्यांना सुद्धा या अन्यायातून मुक्त होऊन न्याय मिळाला पाहिजे", असे वक्तव्य वैभवी देशमुख यांनी केले आहे