“अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन …”, घराबाहेर आल्यावर पॅडी कांबळेचं मोठं विधान

    30-Sep-2024
Total Views |

paddy  
 
 
मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन ७० दिवसांचा असून ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रॅड फिनाले होणार आहे. अवघ्या एक आठवड्यावर असणाऱ्या या महाअंतिम सोहळ्यापुर्वी घरातून ज्येष्ठ विनोदवीर पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेले. बिग बॉसच्या घरातील त्यांचा प्रवास तब्बल ६२ दिवसांनी संपला. दरम्यान, घराबाहेर आल्यावर पॅडी यांवी त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ, एकंदर प्रवास आणि अन्य सदस्यांविषयी आपली रोखठोक मतं मांडली आहेत.
 
नुकतीच त्यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पंढरीनाथ यांनी अभिजीत सावंतविषयी मोठं वक्तव्य केलं असून तो अरबाज पटेलचं सॉफ्ट वर्जन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पंढरीनाथ म्हणाले की, “अभिजितचा वेगळा खेळ आहे. तो फक्त आमच्या ग्रुपमध्ये होता आणि एकत्र आम्ही बसत वगैरे होतो. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता पण, हळुहळू मी त्याला गेममध्ये अनेक गोष्टी बोलायला लागलो. कारण, तो इथेही सारवासारव करायचा…तिकडे जाऊन निक्कीकडे सुद्धा बोलायचा. उद्या नॉमिनेशनची वेळ आली, तर निक्कीने घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करू नये… यासाठी तो असं सगळं करत होता.”
 
पुढे ते म्हणाले की, “मला वाटतं की, अभिजीतचं खरं रुप आता अंकिताने समोर आणायला सुरुवात केली आहे. जसा अरबाज करत होता ना तसा तो वागतोय. कारण, जे लोक बाथरुम, घराचं क्लिनिंग अशी सगळी मोठी काम करतात त्यांना याचा त्रास होतो…ही मोठी कामं निक्की करतच नाही. जसं अरबाजने केलं त्याचं सॉफ्टर व्हर्जन मला अभिजीतमध्ये दिसतंय. मला फक्त तिथे सर्व बोलता आलं नाही. तरीही मी एका-एका वाक्यात त्याला खूप काही बोलून जायचो.”
 
पुढे आपलं मत मांडताना ते म्हणाले की “अभिजीतच्या बाजूने उभं राहावं असं मला फार कधीच वाटलं नाही. कारण, तो मुखवटा त्याच्या चेहऱ्यावर मला दिसत होता… तो मुखवटा अजूनही आहे. ग्रँड फिनाले पार पडला की लोकांना कळेल.” तसेच, पंढरीनाथ यांनी आपल्या कॉईन्सचा नॉमिनी सूरज चव्हाण या केलं असून आजन्म त्याचं पालकत्व घेतल्याची कबूली देखील त्यांनी दिली आहे.