आठवड्यातील चार दिवस कामकाज; 'या' देशातील सरकारचा नवा उपक्रम

    01-Sep-2024
Total Views |
four-day-working-week-in-japan-the-government-started
 

नवी दिल्ली : 
       जपानमध्ये प्रथमच चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे समर्थन केले आहे. सरकारने आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा उपक्रम सुरू केला असला तरी जुनी मानसिकता अडसर ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच, सरकारकडून चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या योजनेला चालना देत आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामागे मजुरांची कमतरता दूर करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर, काम-जीवन संतुलनासाठी जपानमध्ये प्रयत्न केले जात आहे. सरकारने २०२१ मध्ये प्रथम चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याचे समर्थन केले जात असून आता ही कल्पना हळूहळू लोकप्रिय होत आहे.

जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयानुसार देशातील फक्त ८ टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन किंवा अधिक दिवस सुट्टी देतात. तर दुसरीकडे, ७ टक्के कंपन्या फक्त एक दिवस सुट्टी देतात जी कायदेशीररित्या अनिवार्य आहे. विशेषत: लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी, सरकारने "कार्यशैली सुधारणा" मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, कामाचे तास कमी करण्याबरोबरच, लवचिक कामाच्या वेळेची मर्यादा आणि ओव्हरटाइम, वार्षिक सुट्टीचा प्रचार केला जात आहे.