एकापेक्षा एक! वडील नटसम्राट आणि लेक नृत्यसम्राट

शीतल म्हात्रेंचा खोचक टोला

    09-Jul-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : तेजस ठाकरेंच्या नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडीओवर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. वडील नटसम्राट आणि लेक नृत्यसम्राट असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोघांवरही निशाणा साधला. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली.
 
 
 
सध्या मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, नुकताच अनंत अंबांनी आणि राधिका मर्चंटचा संगीत सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली होती. या संगीत समारंभात उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे हे नृत्य करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  वसंत मोरे उबाठा गटात दाखल!
 
याविषयी शीतल म्हात्रे म्हणाल्या की, "अंबानींच्या लग्नातला हा बँकग्राऊंड डान्सर ओळखीचा दिसतोय. हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे. उत्तम कला आहे एकेकाजवळ, वडील नटसम्राट... लेक नृत्यसम्राट…" असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरेंना खोचक टोला लगावला.