राज्य सरकार करणार ४ जगज्जेत्यांचा सत्कार!

    05-Jul-2024
Total Views |
 
Team India
 
मुंबई : टी-२० विश्वकप जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. विधान भवनात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून हे चारही खेळाडू विधानभवनाकडे रवाना झाले आहेत.
 
राज्य सरकारतर्फे शुक्रवारी कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित असलेल्या सर्व आमदारांसमोर मराठमोळ्या पद्धतीने या खेळाडूंचा सत्कार होईल. त्याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या खेळाडूंचा सन्मान केला.
 
हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
 
गुरुवारी मुंबईमध्ये चॅम्पियन टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता विधिमंडळात चार खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.