लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर

    05-Jul-2024
Total Views |
advani
 
नवी दिल्ली : माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपोले रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. “भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवार, दि. 3 जुलै रोजी रात्री 9 वाजता डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे,” अशी माहिती अपोलो रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. यापूर्वीदेखील 96 वर्षीय अडवाणी यांना ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञावन संस्था’ अर्थात ‘एम्स’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यातआले होते.