'मॉडर्न गर्ल' अभिनेत्री स्मृती विश्वास – नारंग कालवश, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला निरोप

    04-Jul-2024
Total Views |


smriti 
 
 
नाशिक : हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्द सुरु करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास - नारंग यांचे नाशिकरोड येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत ३ जुलै २०२४ रोजी निधन झालं.  
 
१९३० ते १९६० च्या काळात स्मृती यांनी हिंदी, बंगाली चित्रपटसृष्टीवर सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवले होते. स्मृती यांनी १९३० मध्ये 'संध्या' या बंगाली चित्रपटातून बालकलाकार म्हणून मनोरंजक्षेत्रात पदार्पण केले. ‘डाका’, ‘अरब का सौदागर’, ‘टकसाल’, ‘सैलाब’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. हिंदी आणि बंगाली भाषेत जवळपास ९० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी कामं केली. आणि स्मृती विश्वास - नारंग यांनी अखेर १९६० मध्ये 'मॉडर्न गर्ल' या शेवटच्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली.
 
हिंदी चित्रपटसृष्टीच्या उभारणीत स्मृती विश्वास - नारंग यांनी मोठे योगदान दिले होते. स्मृती यांना अभूतपुर्व कामगिरीसाठी ‘न्यू इरा दादासाहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121