मुंबई : युवा चेंबूर प्रतिष्ठान आणि सामाजिक सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी परिक्षेमध्ये चांगले गुण संपादन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा दि. २८ जुलै रोजी सत्कार केला जाणार आहे. गेल्या २० वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचा पालकांचा सत्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहे. दरवर्षी अदांजे २ हजार विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अथवा सामुहिकरित्या सत्कार केला जातो.
या कार्यक्रमाला भाजप मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार, माजी आमदार कांताताई नलावडे, मुख्यप्रबंधक धनंजय खामकर (सी.एस.आर) यांच्यासह अन्य मान्यवर चेंबूर हायस्कूल येथे उपस्थित राहणार आहेत.