अतुल भातखळकर यांची भाजप माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती

    24-Jul-2024
Total Views | 46

Bawankuli
 
मुंबई : कांदिवली पूर्व मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांची भाजपच्या माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. 23 जुलै रोजी याबाबत माहिती दिली. नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना “सडेतोड भूमिका व्यक्त करा, विरोधकांना ठोकून काढा,” अशी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर, परखड मते मांडणार्‍या आ. भातखळकर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. बावनकुळे यांनी मंगळवारी नियुक्तीचे पत्र आ. भातखळकर यांना दिले. तसेच त्यांचे अभिनंदनही केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. सुनील खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते मूळचे मुंबई चे होते. मागील तीस वर्ष पुण्यात..

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग कार्यालयामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त असल्याने मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तसेच शासकीय योजनांचा बोजवारा उडाल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121