नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात असणार परदेशी पाहुण्यांची मांदियाळी? 'या' नेत्यांना करण्यात आले आमंत्रित

    06-Jun-2024
Total Views | 104
 narendra modi
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकालनंतर देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीतील १३ पक्षांना मिळून २३४ जागांवर विजय मिळवता आला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ८ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी शेजारील देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याआधीही हे दोन्ही नेते मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहिलेले आहेत.
 
  
शेख हसिना आणि रानिल विक्रमसिंघे यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड उपस्थित राहणार आहेत. २०१९ ला मोदींच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला भारताने BIMSTEC देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. BIMSTEC हा एक प्रादेशिक गट आहे ज्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे. या देशांच्या नेत्यांना यावेळी आमंत्रित केलं जाण्याची शक्यता आहे.
  
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप्रणित एनडीएला तिसऱ्यांदा बहुमत मिळाल्यानंतर जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून, पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शेजारील देशांसह अमेरिका, ब्रिटेन, रशिया, चीन या देशांनी सुद्धा पंतप्रधान मोदींना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121