येत्या २४ तासात मान्सून राज्यात दाखल होणार!

मुंबईत 9 जूनला होणार आगमन; हवामान विभाग

    05-Jun-2024
Total Views |
monsoon updates maharashtra


पुणे :      काल पुण्यात आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असतानाच मान्सूनचा पाऊस देखील राज्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मान्सून आताकेरळपासून पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हा मान्सून चा पाऊस गोव्यात पोहोचला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल पुण्यामध्ये दि 6. गुरुवारी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तर तो मुंबईत 9 जूनला पोहोचेल. अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

तीन दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद उद्यापासून (दि. 6) मान्सून सुरू होत आहे.मुंबई, नाशिक, जालना, औरंगाबाद, परभणी 7 किंवा 8 जूनपर्यंत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.


दहा जूनपासून राज्य व्यापणार मान्सून

10 जूनपर्यंत संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र (किमान जळगावपर्यंत), मराठवाडा मान्सूनने व्यापला जाण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला ते नागपूर 10 जूनपर्यंत मान्सूनने व्यापले जाईल असेही ते म्हणाले.10 जून पर्यंत जवळजवळ 5 दिवस अगोदर (15 जूनच्या सामान्य तारखेपूर्वी) मान्सूनने राज्य 90% व्यापलेले असेल असेही ते म्हणाले.हवामान अभ्यासानुसार 9 ते 12 जून दरम्यान पाश्चिमात्य वारे बळकट होण्याची शक्यता आहे आणि इतर प्रणालींच्या संयोगाने, कोकण आणि लगतच्या घाटात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक भागात सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.