आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेक ईशाचा आनंद गगनात मावेना

    05-Jun-2024
Total Views |
 
esha deol
 
 
मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालांकडे लागले होते. आणि यंदाही अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी तिसऱ्यांदा या निवडणूकीत जिंकल्या आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाचं तिकीट मिळालं होतं. त्यांच्या या विजयानंतर लेक ईशा देओल हिने खास पोस्ट केली आहे.
 
हेमा मालिनींच्या विजयानंतर ईशा देओलने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. ईशा देओलने हेमा मालिनींचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. "अभिनंदन आई, हॅट्रिक", असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 

esha deol 
 
दरम्यान, हेमा मालिनी तब्बल ३ लाख मतांच्या फरकाने निवडूण आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत हेमा मालिनींना एकूण ५ लाख १० हजार ६४ मते मिळाली. २ लाख ९३ हजार ४०७ मताधिक्य राखत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला हरवलं.