राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    05-Jun-2024
Total Views | 124
 Rajya sabha
 
मुंबई :  राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्याची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला दि. 13 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे.
 
 निवडणूक प्रत्यक्ष लढवली गेल्यास दि. 25 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)  (कार्यभार) आणि निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सहसचिव आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहन सदाशिव काकड यांच्यापुढे दि. 13 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र उपलब्ध होतील. 
  
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121