पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, सतरावी लोकसभा भंग

तिसऱ्यांदा शपथ घेईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान काम पाहणार

    05-Jun-2024
Total Views |
modi

नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावी अशी सूचना केली आहे.

राष्ट्रपतींची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मंत्रिमंडळाने बैठकीत राष्ट्रपतींना 17वी लोकसभा त्वरीत बरखास्त करण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारला आहे आणि घटनेच्या कलम 85 च्या खंड (2) च्या उपखंड (ब) द्वारे त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून 17 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.