बँक ऑफ बडोदातर्फे बॅलार्ड पियरवर ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’ लाँच

    11-Jun-2024
Total Views |

bank of baroda
 
 
मुंबई: भारतातील सार्वनजिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) बॅलार्ड पियरवर मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलच्या अगदी समोर ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’ लाँच केले आहे. या डेस्कद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या देशांतर्गत तसेच आंतर राष्ट्रीय पर्यटकांची मदत केली जाईल. मुंबईचा 'क्रुझ टुरिझम हब' म्हणून विकास करण्याच्या उद्देशाने मुंबई पोर्ट ट्रस्टने (MBPT) पोर्टवर नुकतेच ‘ मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल ’ बनवले आहे. सध्या दर आठवड्याला मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून तीन ते चार लक्झरी क्रुझ पर्यटकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणी पोहोचवतात.
 
बोर्डिंग आणि डी- बोर्डिंग प्रक्रियेदरम्यान पर्यटकांची इथे बरीच गर्दी असते बँक ऑफ बडोदाच्या ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’द्वारे मोफत आसनव्यवस्था, पाणी, पर्यटक माहिती गाइड, प्राथमिक वैद्यकीय सहाय्य, कॅब बुकिंग सहाय्य आणि प्रतीक्षा कालावधी सोयीस्कर व्हावा तसेच स्त्री पर्यटकांच्या सोयीसाठी स्वतंत्र एनक्लोजर अशा विविध सेवा प्रवासाचा एकंदर अनुभव अधिक चांगला करण्याच्या हेतूने या सुविधा दिल्या जाणार आहेत.
 
याप्रसंगी बँक ऑफ बडोदा, मुंबई झोनचे व्यवस्थापक आणि झोनल प्रमुख सुनील कुमार शर्मा म्हणाले,‘बँक ऑफ बडोदामध्ये आ म्ही ग्राहकांना जागतिक दर्जाच्या बँकिंग सेवा देण्यासाठी बांधील आहोत. त्याच प्रयत्नांतून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.या उप क्रमाच्या माध्यमातून नागरिक तसेच पर्यटकांशी असलेले नाते आणखी सुदृढ केले जाणार आहे. बँक ऑफ बडोदा मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्कच्या माध्यमातून आम्ही बँकिंगच्या पलीकडे जाऊन पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’