“तुमच्या भारत मातेला त्रास देऊ नका”, लोकसभा निवडणुकीदरम्यान सलमान खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

    18-May-2024
Total Views |
salman  
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून दुसरीकडे सलमान त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात देखील व्यस्त आहे. परंतु, सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने केलेली सोशल मिडिया पोस्ट सध्या लक्ष वेधत आहे.
 
मतदानाच्या दिवशी अनेकजण निष्काळजीपणा करतात आणि त्यांची मतं वाया घालवतेत. अशांसाठी सलमानने पोस्ट करत लिहिले आहे की, “काहीही झालं तरी मी वर्षाचे ३६५ दिवस व्यायाम करतो आणि आता काहीही झालं तरी २० तारखेला मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते करा; पण आधी जा आणि मतदान करा. तुमच्या भारतमातेला त्रास देऊ नका. भारतमाता की जय.”
 
 
 
दरम्यान, सलमान खान आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या कामात व्यस्त आहे, हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना सलमानसोबत पहिल्यांदाच झळकणार आहे. दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.