ओयोने जुना आयपीओ डीएचआरपी अर्ज काढून घेतला आता....

डॉलर बाँडमार्फत ४५० दशलक्ष डॉलर्स उभे करणार

    18-May-2024
Total Views |

OYO
 
 
मुंबई: सॉफ्टबँक संचलित ओयो कंपनीने आपल्या आयपीओसाठी पुन्हा एकदा कागदपत्रे भरली आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनीने डॉलर बाँडमार्फत ४५० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओयोचा आयपीओ येणार होता. तो मार्ग आता मोकळा होण्याच्या मार्गावर आहे. जेपी मॉर्गन या व्यवहारासाठी बँकर म्हणून काम पाहणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे.
 
९ ते १० टक्यांच्या व्याजदरावर डॉलर बाँडची विक्री कंपनी करणार आहे असे वृत्तसंस्थेला बोलताना सुत्रांनी सांगितले आहे. नियामक मंडळ सेबीकडे कंपनीने यासंदर्भात पूर्वीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोसपेकटस (DRHP) मागे घेऊन आता पुन्हा नव्याने एकदा हे परिपत्रक भरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
ट्रॅव्हल टेक कंपनी ओयोची मुख्य संस्था Oravel Stays Ltd ने नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या डोक्यावर असलेली १६२० कोटींची थकबाकी चुकवण्यासाठी बायबॅक प्रक्रिया सुरू केली होती. याबाबत कंपनीने ४५० दशलक्ष डॉलर्स पैकी ३० टक्के (६६० दशलक्ष डॉलर्स) हा थकित वाटा चुकता करण्यासाठी ३० टक्के कर्ज बायबॅक करण्याचे ठरवलं होते. त्यामुळे कंपनीच भार हलका होत आता कंपनीवर ४५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज थकीत आहे.
 
यावर प्रतिक्रिया देताना सूत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, 'पुनर्वित्तीकरणामुळे OYO च्या आर्थिक विवरणांमध्ये भौतिक बदल होतील. त्यामुळे विद्यमान नियमांनुसार, नियामकाकडे फाइलिंगमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. पुनर्वित्तीकरणाचा निर्णय प्रगत टप्प्यावर असल्याने, सध्याच्या आर्थिक बाबींसह IPO मंजुरीचा पाठपुरावा सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही.त्यामुळे सध्याचा अर्ज मागे घेणे शहाणपणाचे आहे.'
 
त्यामुळे आता पुन्हा परतावा घेण्याची मुदत पाच वर्षांनी वाढवण्यात आली आहे. याविषयी अधिक बोलताना, ' पुनर्वित्तीकरणामुळे बाँड जारी करण्याशी संबंधित खर्चाचा हिशेब दिल्यानंतर पहिल्या वर्षी $ ८-१० दशलक्ष (६६.४ -८३कोटी) वार्षिक व्याज बचत होण्याची अपेक्षा आहे. कंपनी $१५ - १७ दशलक्ष वार्षिक बचतीची अपेक्षा करते (१२४.५ १४१.१ कोटी) त्यानंतर, जे जवळजवळ सर्व कर्ज पुनर्वित्त नंतर त्याच्या निव्वळ नफ्यात जोडले जाईल, कंपनी आपली आर्थिक ताकद मजबूत करण्यासाठी सार्वजनिक सूचीसमोर गुंतवणूकदारांच्या विश्वासाची पुष्टी करण्यासाठी कंपनी इक्विटी फेरीचा विचार करण्यास तयार आहे.' असे कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
 
२०२१ मध्ये सेबीकडे ८४३० कोटींच्या आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र आर्थिक कारणांमुळे तो पुढे ढकलला गेला होता.