"भारत आता थांबणार नाही"; रश्मिकाने केले मोदींचे कौतुक

    15-May-2024
Total Views |

rashmika  
 
 
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या हिंदीतही आपली ओळख निर्माण करत आहे. ‘पुष्पा’, 'अॅनिमल' चित्रपटांत रश्मिकाने अप्रतिम काम करत तिचा चाहता वर्ग तयार केला. रश्मिका मंदाना नुकतीच मुंबईत आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामाबद्दल ती व्यक्त झाली. "भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही", असे एका मुलाखतीत तिने म्हणत मोदींच्या कामाचे विशेष कौतुक केले. तसेच, रश्मिकाने यावेळी बोलताना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतुचं कौतुक केले आहे.
 
अटल सेतुबद्दल बोलताना रश्मिका मंदाना म्हणाली, "२ तासाच्या प्रवासाला २० मिनिटे लागतात. असं कधी होईल असा कोणी विचार केलेला का? नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई, बंगळुरू ते मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा झाला आहे. अद्भुत इंफ्रास्ट्रक्चर पाहून मला अभिमान वाटतोय. आता भारत थांबणार नाही. भारतात ही गोष्ट होणार नाही, असं आता कोणीही बोलणार नाही. देशाने गेल्या १० वर्षात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विकास थांबला नाही पाहिजे. विकासासाठी मतदान करा". दरम्यान, रश्मिका लवकरच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये झळकणार आहे.