'चक्कर मारा फिल्टरपाड्याला मग..';ट्रोलर्सना गौरव मोरेने सुनावले खडे बोल

    14-May-2024
Total Views |

Gaurav More 
 
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे सध्या मराठीसह हिंदी मनोरजंनसृष्टीतही आपले नाव मोठे करत आहे. काही दिवसांपुर्वी गौरवने (Gaurav More) महाष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला रामराम केला आणि मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री घेतली. मात्र, या कार्यक्रमात एक स्कीट सादर केल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल केलं असून त्याची तुलना राणू मंडलसोबत केली आहे. या ट्रोलर्सला आता गौरवने चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी गौरव, कुशल आणि हेमांगी या तिघांच्या एका स्कीटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडिओवर लोकांनी कमेंट करत राणू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड अशा शब्दांत हिनवलं आहे.
 
गौरवला एका ट्रोलरने म्हटलं आहे की, “रानू मंडल झालाय बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन्स त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार. एका पॉइंटला सगळं हातातून जाणार… चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच,” असं म्हटलं आहे. त्यावर गौरवने त्याला खडे बोल सुनवत म्हटले आहे की, “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा”. गौरवच्या या रिप्लायवरही ट्रोलरने पुन्हा एक कमेंट करत “अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की? माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी चांगलं माझं आहे म्हणणं आणि तू स्वतःचं बोलतोयस हिंदीत. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड,” अशी कमेंट या ट्रोलरने पुन्हा केली.
 

Gaurav More 
 
फिल्टरपाड्याचा गुंड म्हटल्यावर संतापलेला गौरव म्हणाला, “अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चक्कर मारा फिल्टरपाड्याला मग सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?” , असं उत्तर गौरवने दिलं आहे. गौरवने रिप्लाय दिल्यानंतर संबंधित ट्रोलरने त्याच्या रंगरुपावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. “मुळात तुमच्या सारखा दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळतं नाही चेहरा बघण्याच्या? हिंमत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला, त्यात अगदी हिंमत नाही वगैरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वच्छ एरिया आहे. सॉरी मला अ‍ॅलर्जी होईल. पण मी मान्य करतो तू तिथला हिरो असशील नो डाउट.”
 
यावर गौरव म्हणाला, “हिंमत पाहिजे नाहीतर अशाना समाजात काय बोलतात माहित आहे ना. अहो, चेहरा बघितल्यानंतर कळतं ना हा हिंमत आहे म्हणून आणि कोण आहे हा जो एवढा बोलतो मला, ज्याला मी इकडे आमंत्रण सुद्धा दिलं नाही. चला पाटील कोण आहे हे कळू द्या लोकांना या समोर आणि एरिया कसा आहे, तो माझा आहे, माझी भूमी आहे. तुमच्यासारखा लपून नाही बोलतो जे आहे ते समोर आहे. डिपी ठेवा,” असं सडेतोड उत्तर गौरवने दिलं. गौरव मोरचा आगामी 'अल्याड पल्याड' चित्रपट लवकरच येणार असून याशिवाय महापरिनिर्वाण चित्रपटातही तो महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे.