पुढील २४ तासांत मुंबईत वादळी पावसाचा इशारा!

    13-May-2024
Total Views |

Rain 
 
मुंबई : मुंबई उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३ ते ४ तास वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय वादळी पावसामुळे मुंबईतील वाहतूकही ठप्प झाली आहे.
 
सोमवारी मुंबईत अचानक अवकाळी पाऊस कोसळल्याने नागरिकांना फटका बसला आहे. मुंबईतील कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा अनेक भागांत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे. तसेच मुंबईत पुढील ३ ते ४ तास वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर उतरवल्या!
 
याशिवाय वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर आणि वडाळा या भागांमध्ये भलेमोठे होर्डींग कोसळल्याची दुर्घटनाही घडली आहे. यापैकी घाटकोपरमधील दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.