भारताच्या वित्तीय तूटीत अपेक्षेहून अधिक घट

नेमकी आकडेवारी ३१ मे मध्ये जाहीर होणार

    10-May-2024
Total Views |

Fiscal Deficit
 
 
मुंबई: भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या वित्तीय तूटीत तुलनेने घट झाली आहे. सरकारच्या अपेक्षित निकालाहून वित्तीय तूटीत मार्च २०२४ पर्यंत घट झाली. सरकारने १७.३५ ट्रिलियन रुपयांचे भाकीत केले होते त्यापेक्षा वित्तीय तूटीत घट झाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
 
वाढलेल्या कर संकलनाने व कर व्यतिरिक्त मिळालेल्या मिळकती महसूलामुळे ही उत्पन्नात वाढ झाली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे पर्यंत आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील वित्तीय तूटीचे नेमकी आकडेवारी प्रदर्शित होणार आहे. देशाच्या आयकर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारने यापूर्वी एकूण जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) पैकी ५ टक्क्यांची ५.८ टक्के वित्तीय तूट पकडली होती. सरकारने यावर नेमकी किती टक्के तूट झाली याची आकडेवारी अजून जाहीर केलेली नाही.
 
भारतातील लोकसभा निवडणूकीमुळे ही घोषणा पुढे ढकलली गेल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अशातच सरकार आरबीआयकडून सरकारी बाँडची पुन्हा खरेदी करू शकते कारण आरबीआयने यासंबंधीची परवानगी सरकारला दिली होती. एकूण १०५.१० अब्ज रुपयांचे बाँड गुरूवारी आरबीआयने गुरूवारी खरेदी केले होते.