लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय आता रंगभूमी गाजवणार

    04-Apr-2024
Total Views |
अभिनय लक्ष्मीकांत बेर्डेचे रंगभूमीवर पहिले पाऊल, आज्जाबाई जोरात नाटकातून करणार नवी सुरुवात
 

abhinay  

मुंबई : मराठी रंगभूमी असो किंवा चित्रपटसृष्टी लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या नावाशिवाय सारं काही अपुर्णच आहे. विनोदाचं अचूक टायमिंग आणि तितक्याच ताकदीने एखादी गंभीर भूमिका निभावण्याचे कसब लक्ष्मीकांत (Laxmikant Berde) यांच्यात होते. त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे (Laxmikant Berde) आता वडियांच्या पावलांलर पाऊल ठेवून रंगभूममीकडे वळला आहे. आज्जीबाई जोरात या नाटकातून तो रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.
अभिनय बेर्डेने याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रेवेश केला आणि आता आज्जीबाई जोरात नाटकाच्या निमित्ताने तो रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला असून त्याने एक पोस्ट देखील केली आहे. याबाबत पोस्ट शेअर करत अभिनय म्हणतो, "तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!".
 
 abhinay  
 
दरम्यान, आज्जीबाई जोरात हे पहिलं AI महाबालनाट्य असून यात आताची मुलं आणि त्यांच्या हातात असणारा फोन याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. या नाटकात जयवंत वाडकर, मृण्मयी गोडबोले, निर्मिती सावंत अशी तगडी कलाकारांची फौज असणार आहे.
 

abhinay