इंदिरांची संपत्ती नातवंडांना मिळावी म्हणून राजीव गांधींनी बदलला कायदा

    25-Apr-2024
Total Views | 318
 gandhi
 
नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे सल्लागार आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी 'इनहेरिटन्स टॅक्स'चा ( Inheritance Tax ) मुद्दा उपस्थित केला. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन देशातील जनतेकडुन त्यांनी कमावलेली संपत्ती हिसकावुन घेण्याचा काँग्रेसचा मानस आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस वारसा कर देशात लागु करणार आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे.
 
हा वारसा कर कायदा देशात यापुर्वी ही अस्तित्वात होता. ‘वारसा कर’ ही संकल्पना देशात तीन दशकांपासून अस्तित्वात होती. इस्टेट ड्युटी कायदा १९५३ अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसावरील कर ८५ % पर्यंत जाऊ शकत होता. २० लाखांहुन अधिक संपत्तीवर या अंतर्गतकर लावला जात होता. हा कर लागू करून निधी उभारण्याची काँग्रेसची योजना होती, परंतु यामुळे बेनामी मालमत्ता आणि मालमत्ता लपवून ठेवण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. हा कायदा काँग्रेस सरकारने १९८५ मध्ये रद्द केला होता.
हा कायदा १ एप्रिल १९८५ ला रद्द करण्यात आला होता. त्यावेळी व्ही. पी . सिंग अर्थमंत्री होते. कायदा रद्द झाल्यानंतर काहीच दिवसात २ मे १९८५ ला इंदिरा गांधी यांची सुमारे २१ लाख ५० हजार रुपयांनी संपत्ती त्यांच्या तीन नातवंडांना हस्तांतरीत करण्यात आली. आज त्या मालमत्तेची किंमत सुमारे ४.२ कोटी रुपये आहे. २० लाख रुपयांहुन अधिक संपत्ती असल्यास ८५ % मालमत्ता सरकारकारकडे जाण्याचा कायदा राजीव गांधींच्या सरकारमध्ये त्यांच्या मुलांना आजीचा वारसा मिळणार होता तेव्हाच उलट झाला होता.
 
काँग्रेस सत्तेत आली तर संपत्तीचे सर्वेक्षण करुन पुनर्वितरण करणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी प्रचारादरम्यान केली. त्यावरुन काँग्रेस वारसा कर कायदा परत आणणार का असे प्रश्न उपस्थित झाले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसवर टीका करत. तुमच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीला तुमच्या मुलांना देण्यावर कर लावण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचं त्यांनी म्हटले होते.


अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121