मिल्क सिटी आणंद येथे साकारतेय बुलेट ट्रेन स्थानक

भारताच्या मिल्क सिटीत पहिले स्थानक आकारास

    20-Apr-2024
Total Views |

anand station


मुंबई, दि.२०:
मिल्क सिटी ऑफ इंडिया म्हणून परिचित असणारे गुजरात राज्यातील आणंद शहर आता आगामी काळात बुलेट ट्रेनमुळेही प्रसिद्धीस येणार आहे. मिल्क सिटी अशी ओळख असणारे आणंद शहर बुलेट ट्रेन स्थानकाचे अंतरंग आणि बाह्यरंग दुधाच्या थेंबांचे द्रवरूप स्वरूप, आकार आणि रंगाची प्रतिकृती असेल. जे भारताची दुधाची राजधानी आणंदच्या आसपास आहे.

आणंद बुलेट ट्रेन स्थानकासाठी पायलिंगचे काम डिसेंबर २०२१मध्ये सुरू करण्यात आले होते. सध्या कॉनकोर्स स्लॅब, ट्रॅक स्लॅब आणि स्ट्रक्चरल स्टीलचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या स्थानकात तीन मजले (ग्राऊंड, कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्म) असतील ज्यात दोन बाजूचे प्लॅटफॉर्म आणि मध्यभागी ४ ट्रॅक असतील. हे सर्व आधुनिक आणि प्रगत सोयी-सुविधांनी सुसज्ज असेल. तिकीट आणि वेटिंग एरिया, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट, इन्फॉर्मेशन बूथ, रिटेल सेंटर आदी सुविधा असतील. शिवाय नैसर्गिक प्रकाशासाठी छत आणि बाहेरील बाजूस स्कायलाईटची व्यवस्था असेल.

एनएच-६४शी लिंक रोडद्वारे स्थानकाच्या सध्याच्या कनेक्टिव्हिटीव्यतिरिक्त, एनएचएसआरसीएलने एका बाजूला थेट एनएच-६४आणि दुसऱ्या बाजूला एसएच-१५०पर्यंत कनेक्शन स्टेशनसाठी व्हायाडक्टसह अतिरिक्त जमीन संपादित केली आहे. मल्टिमोडल ट्रॅफिक इंटिग्रेशन प्लॅन सर्व वाहनांची (सार्वजनिक आणि खाजगी) सुरळीत, जलद, सुरक्षित आणि आरामदायक वाहतूक सुनिश्चित करते. पार्किंग आणि पिकअप/ड्रॉप ऑफ सुविधांचे नियोजन करताना स्थानक परिसरातील पादचारी व मध्यवर्ती सार्वजनिक वाहतूक (आयपीटी) वाहतुकीचा (जसे की ऑटो रिक्षा इत्यादी) पुरेसा विचार करण्यात आला आहे.

पादचारी प्लाझाच्या जागेसह कार, दुचाकी, ऑटो आणि बससाठी स्थानक इमारतीशेजारी प्रवासी पिक अँड ड्रॉप ऑफ आणि पार्किंगची सुविधा आखण्यात आली आहे. पिक-अप/ड्रॉप ऑफ क्षेत्र वेगळे केल्याने खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांसाठी पिक-अप/ड्रॉप ऑफ वेळ कमी होईल आणि स्टेशनच्या आवारात सुरळीत वाहतूक होईल आणि विशेषत: ऑपरेशनच्या व्यस्त वेळेत गर्दी कमी होईल. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक उत्तरसंडा रेल्वे स्थानक असेल, जे स्थानकापासून सुमारे ६०० मीटर पूर्वेस स्थित आहे, तर सर्वात जवळचे प्रमुख स्थानक नडियाद जंक्शन रेल्वे स्थानक असेल, जे स्थानकापासून सुमारे १० किमी अंतरावर स्थित आहे. सर्वात जवळचे विमानतळ वडोदरा विमानतळ आहे, जे ५४ किमी अंतरावर आहे तर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकापासून ७० किमी अंतरावर आहे. स्टेशनवर ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सर्व मूलभूत साधनांशी एकत्रिकरण करून निर्माणाधीन स्थानक एक हब म्हणून विकसित केले जाईल.
आणंद बुलेट ट्रेन स्थानकाची ठळक वैशिष्ट्ये
 
• प्लॅटफॉर्मची लांबी - 415 मीटर
• स्थानकाची उंची – 25.6 मीटर
• एकूण बांधकाम क्षेत्र - 44,073 चौरस मीटर