Q4 Results: IREDA चा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर कंपनीचा निव्वळ नफा ३३७.३७ कोटींवर

निव्वळ नफ्यात ३३ टक्क्याने वाढ झाली

    20-Apr-2024
Total Views |

IREDA
 
मुंबई: सरकारी कंपनी आयआरइडीए (IREDA) ने शुक्रवारी आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. आयआरइडीएच्या निव्वळ नफ्यात ३३ टक्क्याने वाढ झाली असून कंपनीचा नफा ३३७.३७ कोटींवर पोहोचले आहे.आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मागील जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीला २५३.६१ कोटींचा नफा झाला होता.
 
आर्थिक वर्ष २०२४ मधील चौथ्या तिमाहीतील उत्पन्नात १३९१.६३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीला १०३६.३१ कोटींचा नफा झाला होता. मागील वर्षाच्या ७४७.९३ कोटींच्या तुलनेत खर्चातही वाढ होत खर्च ९११.९६ कोटींवर पोहोचला आहे. ग्रीन फायनान्सिंग कंपनी आयआरइडीएला करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ४४.८३ टक्क्यांनी वाढ होत १२५२.२३ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या एनपीए (Non Performing Assets) मध्ये घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील १.६६ टक्क्यांवरून एनपीए घसरत २०२३-२४ मध्ये ०.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
या निकालाबाबत बोलताना, 2024 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांबद्दल भारतीय एक्स्चेंजना माहिती देताना, IREDA ने सांगितले की,"IREDA ने १२५२.२३ कोटींचा सर्वकालीन उच्च वार्षिक नफा (PAT) प्राप्त केला आहे, जो मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत ४४.८३ % ची प्रभावी वाढ दर्शवित आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये १.६६ % वरून २०२३-२४ मध्ये नेट नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPAs) यशस्वीरित्या कमी केले आहेत, ज्यामुळे वार्षिक ४०.५२ % ची लक्षणीय घट झाली आहे." असे आयआरइडीएने सांगितले आहे.
 
कंपनीच्या मूल्यांकनात मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील ५९३५.१७ कोटींवरून ४४.२२ टक्क्यांनी वाढ होत ८५५९.४३ कोटींवर मूल्यांकन पोहोचले आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीची कर्ज मंजुरी २३४०७.५७ कोटी होती, ज्याने आर्थिक वर्ष २३ मधील चौथ्या तिमाहीत मंजूर केलेल्या ११७९६.९५ कोटी कर्जाच्या रकमेच्या तुलनेत वार्षिक ९८.४२ टक्के वाढ नोंदवली.