“कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी प्रसाद ओकची विशेष पोस्ट

    01-Apr-2024
Total Views |
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर देखील भरघोस कमाई केली आहे.
 

prasadoak  
 
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपट हिंदीनंतर आता मराठी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा (Swatantryveer Savarkar) मराठी भाषेतील स्क्रिनिंग सोहळा संपन्न झाला. या खास शोसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता प्रसाद ओक पत्नी मंजिरी ओकसोबत उपस्थित होता. चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक याने खास पोस्ट शेअर केली आहे.
 
प्रसाद ओक याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी एक खास पोस्ट केली आहे. तो लिहितो, “‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ अप्रतिम चित्रपट! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी, अतिशय संयत अभिनय, उत्तम पटकथा, देखणं छायाचित्रण, परिणामकारी पार्श्वसंगीत…रणदीप हुड्डा-अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!”. पुढे त्याने लिहिले आहे की, “चित्रपट आता मराठीत सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी वीर सावरकरांना आवाज दिला आहे. कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सावरकरांना त्रिवार वंदन जय हिंद!” अशी पोस्ट प्रसादने केली आहे.
 

prasad post 
 
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मिडिया पोस्टवरुन हा चित्रपट अधिक लोकांनी पाहावा म्हणून आवाहन करत आहेत. तर, अभिनेता सुबोध भावे यांनी मराठीतील चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणदीप हुड्डा यांना आवाज दिला आहे. प्रेक्षकांची मने जिंकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली आहे.