शेअर बाजार विश्लेषण: बाजाराची नवीन सुरुवात दणक्यात सेन्सेक्स ३६३.२० तर निफ्टी १३५.१० अंशाने वर

सर्वाधिक वाढ रियल्टी समभागात

    01-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण
 
मुंबई: आज सकाळप्रमाणे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस पहिल्या दिवशी सकारात्मकता कायम राहिली असून गुंतवणूकदारांना आजच्या गुंतवणूकीत मोठा फायदा झाला आहे. सेन्सेक्स निर्देशांकात आज ३६३.२० अंशाने वाढ झाली आहे तर निफ्टी ५० निर्देशांकातही १३५.१० अंशाने वाढ झाली आहे. अखेरीस सेन्सेक्स ७४०१४.५५ पातळीवर पोहोचला असून निफ्टी २२४६२ पातळीवर पोहोचला आहे. आज सेन्सेक्समध्ये ०.४९ टक्क्याने व निफ्टीत ०.६१ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकही आज ३८१.८४ अंशाने वाढला असून ५३८९७.०३ पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टी बँक निर्देशांक ४५३.६५ अंशाने वाढत ४७५७८.२५ पातळीवर पोहोचला आहे. एस अँड पी बीएससी मिडकॅपमध्ये १.६४ टक्क्याने वाढ व स्मॉलकॅपमध्ये २.९८ टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीमध्ये अनुक्रमे मिडकॅप व स्मॉलकॅपमधील १.८२ टक्क्याने व २.८६ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
निफ्टी मध्ये सेक्टोरल निर्देशांकात आज ऑटो, एफएमसीजी निर्देशांक वगळता उर्वरित निर्देशांक आज तेजीत राहिले आहेत. बँक निफ्टी व्यतिरिक्त फायनांशियल सर्विसेस (१.००%), आयटी ( ०.४१ %) मिडिया (४.६९%) मेटल (३.७० %) फार्मा (१.११%) पीएसयु बँक (१.५१ %), रियल्टी (४.३६%) हेल्थकेअर (१.०७%) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.५६ %) तेल गॅस (०.५२ टक्के) इतके वाढले आहेत. आज सर्वाधिक वाढ रियल्टी समभागात झाली आहे.
 
बीएससीत (BSE) ४०५८ समभागात ट्रेडिंग झाली असताना ३२२५ समभाग आज वधारले असून ६६६ समभागांचे मूल्यांकन घसरले आहे. १६९ समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक अंकाने वधारले असू़न ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण ५७ समभागात झाली आहे. बीएससीत १० समभाग (शेअर) अप्पर सर्किटवर पोहोचले असून ४ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएससीत (NSE) २७४२ समभागांचे ट्रेडिंग (व्यवहार) झाले असताना त्यातील २३१४ समभागांचे मूल्यांकन वधारले असून ३३८ समभागांचे मूल्यांकन घसरले आहे. ११४ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर पोहोचले असून ३४ कंपन्यातील मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर पोहोचले आहे.
 
बीएससीमधील कंपन्यांचे एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) ३९३२२६३३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून एनएससीवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल ३९०.३९ लाख कोटींवर पोहोचले आहे. आज भारतीय रुपया प्रति डॉलर ३.३९ रुपयांना बंद झाला आहे. कोविड काळानंतर एक लिस्टर शेअर्समध्ये २९ टक्क्याने वाढ झाली आहे. ब्लू चीप कंपन्यांच्या बरोबर मिड कॅप व स्मॉलकॅपमधील निर्देशांकात ६० ते ७० टक्क्याने वाढ झाली आहे.
 
क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज एमसीएक्सवर (MCX) वर ०.०६ टक्क्याने वाढ होत तेल ६९१३ प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले आहे. जागतिक पातळीवर मात्र क्रूड तेलाच्या दरात घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. WTI फ्युचर निर्देशांकात ०.२४ टक्क्याने घट झाली असून ८२.९८ रुपये प्रति बॅरेलवर व Brent निर्देशांकात आज ०.३० टक्क्याने घट झाली असून ८६.७४ डॉलरपर्यंत प्रति बॅरेल पोहोचले आहे.
 
निवडणूकीचा धाकधूकीत भारताच्या अर्थव्यवस्थेतील सकारात्मक आकडेवारी, जीडीपीत वाढ होण्याची संभाव्यता व युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात होण्याची जूनमध्ये शक्यता दर्शवली गेल्याने भारतीय बाजारात चढे दर कायम राहिलेले आहेत.एचडीएफसी बँक, लार्सन ट्युब्रो व टाटा स्टिल सारखे समभाग आज तेजीत राहिले असून टायटन नेसले इंडिया सारख्या समभागात आज नुकसान झाले.
 
बीएससीवर जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील,अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, लार्सन, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रीड, विप्रो या समभागात आज गुंतवणूकदारांना फायदा झाला असून सर्वाधिक नुकसान टायटन, नेसले, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, आयटीसी, टेकमहिंद्रा, रिलायन्स, एम अँड एम, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स या समभागात गुंतवणूकदारांना झाले आहे.
 
एनएससीमध्ये जेएसडब्लू स्टील, अदानी पोर्टस, एनटीपीसी, टाटा स्टील, डिवीज, अपोलो हॉस्पिटल, अदानी एंटरप्राईज, एचडीएफसी बँक, कोल इंडिया, डॉ रेड्डी, हिंदाल्को, टीसीएस, विप्रो, एशियन पेटंस, पॉवर ग्रीड या समभागात झाली असून सर्वाधिक नुकसान आयशर मोटर्स, नेसले, बजाज ऑटो, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टेक महिंद्रा, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स या समभागात झाले आहे.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने निर्देशांकात आज मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय फेड दर कपातीचे संकेत असताना सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत १.३४ टक्क्याने सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना मुंबई तरूण भारतला बोलताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, 'बाजाराने आठवड्याची सुरुवात माफक वाढीसह केली आणि अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ करून नवीन जीवन उच्चांक गाठला. गॅप-अप ओपनिंगनंतर, निफ्टीने अरुंद रेंजमध्ये मंदीचा व्यापार केला आणि शेवटी २२४६२ स्तरांवर ओपनिंग रेंजच्या आसपास बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर, रियल्टी आणि मेटलने चांगली कामगिरी केली तर एफएमसीजी आणि ऑटोचे व्यवहार कमी झाले. ब्रॉडर निर्देशांकांनी बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली, ज्यामध्ये स्मॉलकॅप तीन टक्क्यांहून अधिक वाढला तर मिडकॅप दीड टक्क्यांनी वाढला.
 
आम्ही आता निफ्टीमध्ये २२७०० वर लक्ष ठेवत आहोत त्यामुळे सहभागींनी "बाय ऑन डिप्स" दृष्टिकोन राखला पाहिजे. आम्हांला वाटते की बँकिंग पॅकचा सहभाग प्रचलित गती राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील, तर इतर आवर्तन आधारावर सहायक भूमिका बजावू शकतात. व्यापाऱ्यांनी स्टॉक-विशिष्ट दृष्टीकोन राखला पाहिजे आणि सापेक्ष अधिक सामर्थ्य दर्शवणाऱ्या स्टॉकवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'
 
शेअर बाजारातील स्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' "नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी भारतीय बाजारपेठेने मजबूत मार्गक्रमण केले, नजीकच्या काळात ही अनुकूल गती कायम राहण्याच्या संकेत मिळत आहेत. जून आणि Q4FY24 मध्ये एक निरोगी देशांतर्गत कमाई वाढीचा अंदाज दिसून येत आहे .उल्लेखनीय म्हणजे, चिनी पीएमआय डेटाच्या जलद गतीमुळे, आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये कर्षण दर्शविल्यामुळे आज धातूचा साठा उत्कृष्ट झाला. पुढे जाऊन, आरबीआयचे चलनविषयक धोरण, भारताचा पीएमआय डेटा आणि यूएस नॉन- फार्म पेरोल डेटा बाजाराची दिशा ठरवेल."
 
आजच्या निफ्टीतील हालचालींवर व्यक्त होताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, ' "निफ्टी निर्देशांकाने मजबूत सुरुवातीनंतर, 22500 वर प्रतिकाराचा सामना करून, कॉल साइडवरील सर्वोच्च ओपन इंटरेस्टच्या अनुषंगाने एका बाजूच्या ट्रेडिंग सत्राचा सामना केला. वरची गती कायम ठेवण्यासाठी, निर्देशांकाने निर्णायकपणे २१५०० चिन्हाचे उल्लंघन केले पाहिजे, पुढील मार्ग मोकळा केला. २२७००/२२८०० पातळीच्या दिशेने वाढ होत आहे. नकारात्मक बाजूने, समर्थन २२३५० वर स्थित आहे आणि जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहे तोपर्यंत एकूण दृष्टीकोन आशावादी राहील."