महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात ९७ उमेदवार रिंगणात, १९ एप्रिलला मतदान!

लोकसभेच्या मैदानातून १३ जणांनी घेतली माघार

    30-Mar-2024
Total Views |
maharashtra loksabha Election Candidates


मुंबई :   
महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात ९७ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. ३० मार्च रोजी शेवच्या दिवशी १३ जणांनी माघार घेतली असून, उर्वरित उमेदवारांचे भवितव्य १९ एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखे दिग्गज नेते रिंगणात असल्यामुळे हा टप्पा लक्षवेधी ठरणार आहे.


मतदारसंघ...... उमेदवार..... मतदारसंख्या

रामटेक - २८ २० लाख ४९ हजार ८२

नागपूर - २६ २२ लाख २३ हजार २८१

भंडारा गोंदिया - १८ १८ लाख २७ हजार १८८

गडचिरोली चिमूर - १० १६ लाख १७ हजार २०७

चंद्रपूर - १५ १८ लाख ३७ हजार ९०६

एकूण - ९७ ९५ लाख ५४ हजार ६६७


मतदारसंघानिहाय प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे :-

नागपूर - नितीन गडकरी (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस)

रामटेक - राजू पारवे (शिवसेना), शाम बर्वे (काँग्रेस), शंकर चहांदे (वंचित)

भंडारा- गोंदिया - सुनील मेंढे (भाजप), डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस), संजय केवात (वंचित)

गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस), हितेश मांडावी (वंचित)

चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप), प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), राजेश बेले (वंचित)