डिस्कवरी कम्युनिकेशनचा यावर्षी नफा ' इतका' कोटी

२३-२४ मध्ये १ कोटीने नफा वाढला

    30-Mar-2024
Total Views |

Discovery Plus
 
मुंबई: डिस्कवरी कम्युनिकेशन (Discovery Communications) कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ६८ कोटी रुपये इतका झाला आहे.मागील आर्थिक वर्षी २०२२-२३ या वर्षात निव्वळ नफा ६७ कोटी रुपये झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात मोठी वाढ झालेली नाही. या आर्थिक वर्षात नफा १.४९ % टक्क्याने वाढला आहे.
 
डिस्कवरी कम्युनिकेशन ही आंतरराष्ट्रीय नामांकित कंटेट कंपनी असुन कंपनीच्या अंतर्गत १८ चॅनल व डिस्कवरी प्लस हे ओटीटी प्लॅटफॉर्म येतात. कंपनीच्या महसूलात ९.५९ टक्क्याने वाढ झाली असुन महसूल १०५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कंपनीच्या खर्चात ९.६ टक्क्याने घट होत ९७५ कोटी एकूण खर्च झाला असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
 
जाहिरात व प्रमोशनसाठी खर्चात २५ टक्क्याने कपात होत जाहिरांतीवरील खर्चाची संख्या २५० कोटी रुपये इतकी आहे. मात्र कर्मचाऱ्यांवरील खर्चात २९ टक्क्याने वाढ होत १९५ कोटींपर्यंत हा खर्च वाढला आहे. संबंधित माहिती बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म टॉफ्लर कंपनीने दिली असुन ही माहिती कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितली आहे.
 
DCI (Discovery Communications India) हा भारतातील इन्फोटेनमेंट (Infotainment) कंटेंट साधी प्रसिद्ध प्लॅटफॉर्म म्हणून ज्ञात आहे.