'रामायण'मध्ये साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत

    27-Mar-2024
Total Views |
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार. 
 

ramayan  
 
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमकी कोणते कलाकार भूमिका साकारणार यावरुन वेगळ्याच चर्चा जरी रंगल्या असल्या तरी या चित्रपटात (Ramayan) प्रभू श्री राम यांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार हे नक्की आहे. आता या चित्रपटात आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. छोटा पडदा गाजवत पुढे चित्रपटांतही झळकणारी अभिनेत्री साक्षी तन्वर रामायण चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
 
रामायण चित्रपटात साक्षी तन्वर रावणाची पत्नी मंदोदरी हिची भूमिका साकारणार आहे. तसेच, अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असे सांगितले जात आहे. पण संपुर्ण कास्ट बद्दल लवकरच अधिकृत माहिती यावी अशी अपेक्षा सध्या प्रेक्षकांकडून केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार तीन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू रामाचं बालपण ते वनवास, सीतेचे हरण अशा महत्वपुर्ण घटना दाखवण्यात येणार आहेत. तर 'रामायण'च्या दुसऱ्या भागात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची भेट, हनुमान, वानर सेना, रामसेतू या गोष्टी उलगडण्यात येतील. आणि तिसऱ्या भागात वानर सेना आणि रावण सेना यांच्यातील युद्ध दाखवण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, रणबीर कपूर आणि नितेश तिवारी ‘रामायण’ चित्रपटाचे लवकरच मुंबई आणि लंडनमध्ये शुटींगला सुरुवात करणार आहेत.