"आज बाळासाहेब असते तर!"...राज ठाकरे भावूक

    06-Feb-2024
Total Views | 89

Raj Thackeray


मुंबई :
आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज ठाकरेंना बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. यावेळी ते भाविक झाले आणि ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
बाबरीची विट भेट म्हणून स्विकारल्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "६ डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरीचा ढाँचा पडला त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते त्यात बाळा नांदगावकर होते. तो ढाँचा पडल्यानंतर तिथल्या विटांपैकी एक विट बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्यांच्याकडे दोन विटा होत्या. एक त्यांच्याकडे आहे आणि दुसरी त्यांनी भेट दिली. या विटेचं वजन बघितलं तर लक्षात येईल की, त्यावेळीचं बांधकाम किती चांगलं होतं. तेव्हाची बांधकामं चांगली होती कारण तेव्हा टेंडर निघायचे नाही," अशी टिपण्णीही त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "हा ढाँचा पाडल्याचा पुरावा आहे. आता राम मंदिर ज्या विटांपासून बांधलं जात आहे त्यातलीसुद्घा एक विट आणायची आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता," असेही राज ठाकरे म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. सुनील खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते मूळचे मुंबई चे होते. मागील तीस वर्ष पुण्यात..

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग कार्यालयामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त असल्याने मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तसेच शासकीय योजनांचा बोजवारा उडाल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121