ठरलं तर मग! अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; स्वत: जाहीर केली भुमिका

    13-Feb-2024
Total Views | 81

Ashok Chavan


मुंबई :
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आपण याबाबत अद्याप विचार केला नसून येत्या दोन दिवसांत आपली भुमिका स्पष्ट करु असे चव्हाणांनी म्हटले होते.
 
दरम्यान, आता त्यांनी आपली राजकीय भुमिका स्पष्ट केली असून त्यांच्या भाजपमध्ये जाण्यावर त्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, "आज माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रीतसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. दुपारी १२.३० च्या आसपास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. अन्य जिल्ह्यातील काही संभाव्य लोकंही प्रवेश करण्याची शक्यता आहे."
 
तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी परत येण्याबाबत तुमच्याशी संपर्क केला का? यावर ते म्हणाले की, "आता ते सोडा, चॅप्टर इज ओव्हर. आता ही नवी सुरुवात आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, मंगळवारी दुपारी अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121