‘नो क्लोथ’ आणि इराण!

    07-Nov-2024   
Total Views | 69
 
No Cloth and Iran
 
ते हरानच्या ‘आझाद युनिव्हसिर्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च’च्या विद्यार्थिनीने डोक्यावर हिजाब तर घातला नव्हताच, उलट ती त्या भर रस्त्यातल्या चौकात चक्क निर्वस्त्र झाली. निर्वस्त्र अवस्थेत ती रस्त्यातच बसली. सगळ्यांना वाटले की, तिला इराणचे नैतिक पोलीस पकडतील, मारहाण करतील, तुरुंगात डांबतील. तिला पकडण्यात आले, तेव्हा तिची सुटका करावी यासाठी सगळ्यांनी आवाजही उठवला. मात्र, यावेळी इराण सरकारने जाहीर केले की, “ती महिला निर्वस्त्र होऊन रस्त्यात बसली, हा काही आमच्यासाठी गंभीर मुद्दा नाही. या घटनेने इराणच्या सुरक्षिततेला काही धोका नाही. त्यामुळे त्या महिलेला तुरुंगात धाडून शिक्षा देण्याचा प्रश्नच नाही. त्या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याने सरकार तिच्यावर उपचार करत आहे.” त्या महिलेवर उपचार केले जात आहेत. तिची मानसिक स्थिती ठीक नाही. असे इराण सरकारची प्रवक्ता फातिमा मोहाजेरानी हिनेसुद्धा जाहीर केले. अर्थात, इराण सरकारची भूमिकाच तिने यातून मांडली.
 
इराण सरकारने असे म्हणण्याची खोटी, नेमके त्याचवेळी तिच्या पतीनेही व्हिडिओ करून जाहीर केले की, त्याची पत्नी मानसिक रुग्ण असून तिला उपचाराची गरज होती. हे सगळे समजून घेण्यासाठी यामागची पार्श्वभूमी पाहू.
 
इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य. महिलेच्या डोक्यावरचा एक केस जरी दिसला, तरी इराणी प्रशासनाचे ‘मॉरल’ म्हणजे नैतिक पोलीस त्या महिलेला अटक करतात. शिक्षा करतात. कारण, महिलेने डोके न झाकणे, त्यामुळे तिच्या डोक्यावरचे केस दिसणे हा त्यांच्या मते केवढा तरी गुन्हा! कारण का तर, त्यांच्या मान्यतेनुसार महिलांच्या केसात सैतान असतो. तो सभ्य पुरुषांना भुरळ घालतो. अनैतिक वागण्यास प्रोत्साहन देतो. आमंत्रित करतो.
 
तर अशा या इराणमध्ये २०२२ साली अशीच एक घटना घडली. इराणी-कुर्दिश तरुणी मेहसा अमिन हिच्या डोक्यावरचा हिजाब जरा ढळला होता. तिने हिजाब व्यवस्थित घातला नाही, म्हणून इराणी नैतिक पोलिसांनी तिला पकडले. तुरुंगात डांबले. तिला मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इराणमध्ये वादळ उठले, ते आजही शमले नाही. इराणचे धर्मांध प्रशासन जगाच्या पटलावर आले. मात्र, हजारोंना तुरुंगात डांबून, फासावर देऊनही इराणचे प्रशासन त्याच्या धर्मांधतेवर कायम राहिले. हिजाबला विरोध करणार्‍यांना शिक्षा देत राहिले.
 
असे सगळे असताना त्या तेहरानच्या ‘आजाद युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च’च्या विद्यार्थिनीने भर रस्त्यात निर्वस्त्र होऊन इराणच्या धर्मांध सरकारला आव्हानच दिले. खरे तर, इराणचे सध्याचे कट्टर इस्लामवादी प्रशासन या महिलेच्या भयंकर विरोधात आहे, हे काय सांगायला हवे? पण, तरीही ते आजघडीला या महिलेला उघड उघड शिक्षा देऊ शकत नाही. कारण, या महिलेने हिजाबला विरोध केला म्हणून तिला आम्ही तुरुंगात डांबून शिक्षा देणार आहोत, असे म्हणणे इराणला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. कारण, सध्या पॅलेस्टाईनची तळी उचलताना इराण पोळला आहे. त्यातच आजूबाजूच्या इस्लामिक राष्ट्रांचा मोठा भाऊ म्हणून मिरवून घेताना इराणने अमेरिकेसह इस्रायलचे शत्रुत्व ओढवून घेतले. इस्रायलचा ससेमिरा तर थांबायचे नाव घेत नाही, त्यात इराणमध्येही अनेक दहशतवादी संघटना उदयाला आल्या आहेत. इराणमध्ये इस्लामिक पद्धतीची सत्ता असणे हेच इराणचे दुर्दैव म्हणणारी दहशतवादी संघटनाही आहे. दुसरीकडे इराणने आणखीन कडक इस्लामिक राष्ट्र व्हावे, या हेतूने दहशतवाद माजवणार्‍याही संघटना आहेत. या सर्व संघटना कायमच इराणमध्ये हिंसा करत असतात.
 
बरे, इराण हा शिया मुसलमानांचा देश. त्यामुळे शिया आणि सुन्नी मुसलमांनाचे आपसात जे काही धर्मयुद्ध चालले आहे, त्याच्या आणखी वेगळ्या कथा-व्यथा, तर अशा युद्धाच्या आणि हिंसेच्या तणावात असलेल्या इराणला आता आणखीन गृहयुद्ध परवडण्यासारखे नाही. रस्त्यात निर्वस्त्र होणार्‍या विद्यार्थिनीला शिक्षा दिली, तर इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला आणखी बळ मिळेल. ते नको, म्हणूनच इराणने जाहीर केले की, त्या महिलेला शिक्षा न देता, तिच्यावर मानसिक उपचार केले जात आहेत. आज ना उद्या यामागचे सत्यही बाहेर येईलच. ‘नो हिजाब’च्या समर्थनार्थ ‘नो क्लोथ’चे हे आंदोलन तुर्तास इराणने थोपवले आहे. पण किती काळ? हेसुद्धा येणारा काळच सांगेल!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121