ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा दणका! रवी राजा भाजपमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

    31-Oct-2024
Total Views | 241

Ravi Raja
 
मुंबई : काँग्रेसचे माजी नेते रवी राजा (Ravi Raja)  यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे आता काँग्रेस नेते रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत गुरूवारी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपला बळकटी मिळाली आहे.
 
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांना काँग्रसने तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. ते सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा नाराज झाले आहेत.
 
काँग्रेसने कामाची पोचपावती न दिल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान भजपात प्रवेश केल्यानंतर रवी राजा यांनी कोणतीही एक अट ठेवली नाही. त्यांनी भाजपात निस्वार्थ पक्षप्रवेश केला आहे. रवी राजा यांना काँग्रेसमधून तिकीट न दिल्याने स्थानिक मतदारवर्गात असंतोष निर्माण आहे. याचा विपरित परिणाम हा सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश यादव यांच्या मतांवर परिणाम होण्याची चिंता आता काँग्रेसला सतावत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121