मुंबई : सध्याच्या सोशल मिडियाच्या दुनियेत कधी काय होईल याचा खरंच नेम नाही. जीवंत असलेल्या माणसांना मृत घोषित केल्याच्या अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असतात. नुकतीच मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली आहे त्यांच्या चाहतावर्गामध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्याचे अभिनेत्रीने सांगितले. नीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही खळबळजनक माहिती दिली.
दरम्यान, नीना कुळकर्णी यांच्या मृत्यूची बातमी एका युट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आली होती. त्यावर स्वत: पोस्ट करत अभिनेत्रीने या खोट्या बातम्यांचे खंडन केले आणि त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.
नीना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या मृत्यूविषयी खोटी बातमी पसरवली जाते आहे. मी जिवंत आहे आणि स्वस्थ आहे. देवाच्या कृपेने कामामध्ये व्यग्र आहे. कृपया अशा अफवांकडे दूर्लक्ष करा आणि अजिबात प्रोत्साहन देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळो.'