६० ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांचा ईएसआय योजनेत समावेश; ईएसआयसीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी!

    27-Oct-2024
Total Views |
esic policy social commitment


मुंबई :      कर्मचारी राज्य विमा योजना(ईएसआय) अंतर्गत आणखी नव्या कामगारांची नोंद झाली आहे. ईएसआय योजनेंतर्गत नव्या २०.७४ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून यात तरूण वर्गाचा मोठा वाटा आहे. २५ वर्षे वयोगटातील ९.८९ लाख कर्मचाऱ्यांचा नवीन नोंदणीत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर, ४.१४ लाख महिला कर्मचाऱ्यांचा ईएसआय योजनेत समावेश झाला आहे.




दरम्यान, एकीकडे कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेताना दुसरीकडे ६० ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांचा ईएसआय योजनेत समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये २८,९१७ नवीन आस्थापनांचा ईएसआय योजनेत समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे, ऑगस्ट २०२४ मध्ये २०.७४ लाख नवीन कर्मचारी समाविष्ट झाले असून या योजनेच्या सामाजिक सुरक्षा छत्राचा लाभ आता अधिक कामगारांना मिळणार आहे.

यासोबतच ऑगस्ट २०२३च्या तुलनेत नोंदणीमध्ये ६.८० टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात नोंदणीकृत नवीन कर्मचाऱ्यांच्या १.३२ लाख कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीतून दिसून येते की, ऑगस्ट महिन्यातील २०.७४ लाख कर्मचाऱ्यांपैकी ९.८९ लाख कर्मचारी म्हणजेच सुमारे ४७.६८ टक्के कर्मचारी २५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत. या माध्यमातून ईएसआयसीच्या वतीने प्रत्येक वर्गासाठी लाभ वितरित करण्याची बांधिलकी स्पष्ट होताना दिसते आहे.