प्रसाद लाड यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल! म्हणाले, "त्यावेळी दावोसच्या हॉटेलमध्ये..."
15-Jan-2024
Total Views | 126
मुंबई : त्यावेळी दावोसच्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या हे सांगण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये, असा हल्लाबोल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. या टीकेला आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, "आदित्य ठाकरेंनी जरा मागे वळून २०२०-२१ चा काळ आठवला पाहिजे. स्वत:चे पिताश्री हॉस्पीटलमध्ये असताना दावोसची चैन कोण करत होतं, हे सांगण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये. त्यावेळी कोणकोण दावोसला गेले होते, दावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि दावोसचं काम किती झालं, याचे व्हिडीओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये."
ते पुढे म्हणाले की, "वऱ्हाड निघालं दावोसला पण घेऊन येणार २ लाख कोटी हे सांगायला ते निश्चित विसरले असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, आणि अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा सल्ला आम्हाला नको आहे," असेही ते म्हणाले.