लोअर परळचा लाडका गणपत्ती बाप्पाच्या मंडपात आरती संग्रहाचे प्रकाशन

    18-Sep-2023
Total Views |
Aarati Collection Publication At Lower Paral Ganeshotsav

मुंबई : बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग लोअर परळ व शिवशाहू प्रतिष्ठान यांच्यावतीने ६० पानाचे आरती पुस्तक प्रकाशन सोहळा बाळ गोपाळ सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव लोअर परळचा लाडका म्हणून ख्याती असलेला गणपती बाप्पाच्या मंडपात करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने लोअर परळ विभागातील तीन हजारांहून जास्त घरगुती गणपती घरात या आरती संग्रहाचे वाटप विनामूल्य करण्यात येणार आहे.

आरती संग्रहासाठी तिरुपती को.ऑप.क्रेडिट सोसायटी अध्यक्ष निलेश मानकर यांच्यासह बाळ गोपाळ मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक विश्वनाथ परब, अध्यक्ष सचिन गायकवाड, चिटणीस राजा पाटील यांचे सहकार्य लाभले.

प्रकाशन सोहळ्यात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांच्यासह रविंद्र देसाई, शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण, प्रकाश यादव, गणेश खेनट, प्रविण पवार, धोडिबा सासुलकर, तानाजी धनुकटे, सम्राट चव्हाण, भरत पाटील, कीरण पाटील, प्रसाद भोसले, विनोद नांगरे, संदिप गुरव, प्रशांत गमरे, संजय रेडेकर, शारदा खेनट व बच्चे कंपनी यांची उपस्थिती होती.


ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

'माझा बाप्पा येणार, घर अंगण त्याच्या आगमनासाठी सजणार', पर्यावरणपूरक आरास मी करणार. आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाला काही दिवसच उरले आहेत. घरोघरी तयारी सुरू झाली आहे. आपण केलेली बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक असेल तर, तुम्ही हजारोंची बक्षिसे जिंकू शकता. 'दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल.

स्पर्धेची नियम व अटी :

१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी

२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.

३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी

४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.

५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.

६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य

७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.