मुंबई : अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या तिच्या आगामी ततलुबाज चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. मात्र, या चित्रिकरणादरम्यान तिने पहिल्यांदाच वाराणसीला भेट दिली आहे. यावेळी तेथील संस्कृती आणि इतिहासाची तिला भूरळ पडली असून वाराणसीची ही पहिली भेट रोमांचकारी असल्याच्या भावना नर्गिसने व्यक्त केल्या आहेत.
नर्गिस म्हणाली, "वाराणसीची माझी पहिली भेट रोमांचकारी होती. मी नेहमीच या शहराच्या पवित्रतेबद्दल आणि जगातील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक असल्याबद्दल ऐकले होते आणि एक प्रवासी म्हणून इथल्या नवीन ठिकाणांना भेट देत आनंद झाला आहे. वाराणसीतील बरीच ठिकाणे पाहिल्यानंतर समृद्ध संपन्न अनुभव आला. संध्याकाळच्या आरती सोहळ्यापासून ते पहाटेच्या निर्मळ बोटीने गंगेवर फिरण्यापर्यंत सारं काही मनाला सुखावणारे होते. इतकंच नाही, तर चित्रिकरणावेळी घाटांवर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे आणि भव्य जुन्या मंदिरांत जाऊन दर्शन घेणे आल्हाददायक होते". नर्गिस फाखरी तत्लुबाजच्या निमित्ताने ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.